कॉमन्स:विकी लव्हज फोकलोर २०२३

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Wiki Loves Folklore 2023 and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Wiki Loves Folklore 2023 and have to be approved by a translation administrator.

Shortcut: COM:WLF23

  • Home Page
  • 2023
  • 2022
  • 2021
  • 2020
  • 2019


Wiki Loves Folklore Logo.svg

विकी लव्हज फोकलोर मध्ये आपले स्वागत आहे!

Wiki Folklore on website Wiki Folklore on Facebook Wiki Folklore on Twitter Wiki Folklore on Instagram Wiki Folklore on Telegram Wiki Folklore on YouTube Wiki Folklore via mailing list

विकी लव्हज फोकलोर

विकी लव्हज फोकलोर (मेटा-विकी: विकी लव्हज फोकलोर) ही जगातील विविध प्रदेशांतील लोकसंस्कृतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठीची विकिमीडिया कॉमन्सवर दरवर्षी आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आहे. विकी लव्हज फोकलोर २०२२ ही लोकसंस्कृतीची संकल्पना असलेली विकी लव्हज फोकलोर २०२१ ची निरंतरता आहे. या प्रकल्पाची सुरुवात इ.स. २०१८ मध्ये विकी लव्हज फोकलोर २०१९ पासून प्रेमाचा उत्सव आणि सणांच्या संकल्पनेने झाली.

व्याप्ती

ही छायाचित्रणाची स्पर्धा विविध प्रदेशातील लोकसंस्कृतीवर केंद्रित आहे, जसे की लोकोत्सव, लोकनृत्य, लोकसंगीत, लोककला, खेळ, पाककृती, पेहराव, लोकसाहित्य आणि परंपरा, बालगीते, लोककथा, परीकथा, दंतकथा, पारंपारिक गाणे आणि नृत्य, लोक नाटके, खेळ, हंगामी कार्यक्रम, दैनिक चालीरीती, लोककला, लोक धर्म, पौराणिक कथा इत्यादींचा यात समावेश असला तरी ही स्पर्धा इतक्यावरच मर्यादित नाही. तुम्ही आमच्या वर्गपानावर काही इतर सूचना आणि उदाहरणे पाहू शकता.

संकल्पना

फोकलोर (लोकसाहित्य)
उपवर्ग देशानुसार लोकसंस्कृती, लोककला, चिनी भविष्य कथन, लोकनृत्य, युरोपाडे, लोकोत्सव, लोकगीत, लोक खेळ, गवारी, लोकगट, लोक जादू, लोकसंग्रहालये, लोकसंगीत, न्यूवेलिंग, लोकधर्म, पारंपारिक संगीत, पारंपारिक गाणी, लोक कुस्ती.


बक्षिसे

१ले पारितोषिक: ५००$

२रे पारितोषिक: ४००$

३रे पारितोषिक: ३००$

पहिली १० सांत्वनपर बक्षिसे: प्रत्येकी ४०$

सर्वोत्कृष्ट चित्रफीत पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिफीत पारितोषिके: १५०$ आणि १५०$

सर्वोच्च चित्रसंचिका चढववणीसाठीचे बक्षीस: प्रथम पारितोषिक: १००$, द्वितीय पारितोषिक: ५०$

विकी लव्हज फोकलोर पोस्टकार्ड: सर्वोच्च १०० चढवयांना

स्थानिक आयोजकांना प्रमाणपत्रे आणि पोस्टकार्ड.

(टीप: बक्षिसे भेट कार्ड किंवा व्हाउचर स्वरूपात वितरित केली जातील.)

कालावधी

WLF २०२३ चा कालावधी अद्याप ठरलेला नाही

  • १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३
  • सादरीकरणास प्रारंभ: फेब्रुवारी १, २०२३ ००:०१ (UTC)
  • सादरीकरणाची अंतिम मुदत: ३० मार्च २०२३ २३:५९ (UTC)
  • निकालाची घोषणा: घोषित करणे अजून बाकी आहे (टीप: निकाल घोषित करणे बदलांच्या अधीन आहे आणि विशिष्ट परिस्थितीनुसार विलंब होऊ शकतो.)

आम्हाला हे स्विकार्य नाही

आम्ही हे माध्यम स्वीकारणार नाहीत:

  • कॉमन्स प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राबाहेरचे.
  • ज्यात EXIF माहितीचा अभाव आहे.
  • जे जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले आणि डिजिटली बदललेले आहेत.
  • अश्लील आणि उघड प्रतिमा.
  • प्रताधिकारीत कलाकृती इ.

संपर्क:

पुढील विविध प्रकारे आमच्याशी संपर्क साधू शकता:

पाठवण्या योग्य फोटोंची उदाहरणे

फोकलोर लोक आणि उपक्रम

लोक खाद्य

लोक नृत्य

लोकोत्सव

लोक संगीत

लोकभूषा/वस्त्र


लिखाणाची स्पर्धा

१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत लेखन स्पर्धा स्त्रीवाद आणि फोकलोर २०२३ असेल. विकिपीडियावर लोकसंस्कृती संकल्पनेसह विकी लव्हज फोकलोर प्रकल्पासाठी स्त्रीवाद, महिला चरित्रे आणि लिंग-केंद्रित विषयांवर लेख तयार करा किंवा असलेल्या लेखाचा विस्तार करा. तुमच्या स्थानिक भाषेत आता सहभागी व्हा.