User:Sohan wankhade

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

।। शिदोरी ।।


कोणास का कधी कळावे, नसे सोबती का मागे वळून बघावे। सुटतो साथ मग आप्तजनांचा, मनी प्रश्न पडे कधी हसवावे नि कधी रडवावे।।


कोणास का कधी कळावे, शब्द हे त्याचे नि बोल हि त्याचेच। आयुष्याला नसे साथ कोणाची, जन्म हा त्याचा नि मरणही त्याचेच।।


कोणास का कधी कळावे, वाटेवरील मरण कसे पचवावे। सुख-दुःखाची होईल शेवटी बेरीज, उरले शिल्लक काहीच नसावे।।


कोणास का कधी कळावे, अन कित्येक विचार उरी उफाडावे। जणू सागरास जाऊनि भिडावे, जाता जाता सुंदर क्षण आठवावे।।


कोणास का कधी कळावे...