User:Sureshsdaoo

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
           सारावली                
     "अथसकलारिष्टभङ्गाध्याय"                
 सर्वातिशाय्यतिबला: स्फुरदंशुमाली लग्नेस्थत:प्रमशयेत् सुरराजमन्त्रा ।
  एको बहुनि दुरितानि सुदुस्तराणि भक्त्या प्रयुक्त इव चक्रधरे प्रणाम  ॥1॥     

सैाम्यग्रहैरतिबलैर्विबलैश्च पापै-लग्नं च सैाम्यभवने शुभदृष्टियुक्तम् । सर्वपदाविरहितो भवति प्रसूत:पूजाकर: खलु यथा दुरितैर्ग्रहाणाम् ॥2॥

मराठी:- जर ईतर ग्रहांच्या तूलनेंत अत्यंत प्रबळ आणि दैदिप्यमान गुरु लग्नांत असल्यांस असा गुरु सर्व अरिष्टािंचा नाश करतो जसा भक्तिभावाने भगवान विष्णु यांना नमस्कार केल्याने सहस्त्र पापां पासुन मुक्ती प्राप्त होते. सर्व शुभग्रह अत्यंत बलवान असुन पापग्रह निर्बली असल्यांस व लग्नांत शुभ ग्रह, लग्न शुभ ग्रहाने दृष्ट असल्यांस सर्व अरिष्टांचा परिहार होतो जसा नवग्रह पुजा केल्याने ग्रहोत्पन्न पापफलांचा नाश होतो.

पापा यदि शुभवर्गे सैाम्यर्दृष्टा: शुभांशवर्गस्थै:।निघ्नन्ति तदा रिष्टं पतिं विरक्ता यथा युवति: ॥3॥ राहुस्त्रिषष्ठलाभे लग्नांत् साैम्यैर्निरीक्षित: सद्य:। नाशयति सर्वदुरितं मारुत इव तूलसंघातम् ॥4॥

जर पापग्रह शुभग्रहाच्या वर्गांत असुन शुभग्रहाच्या नवमांशात शुभग्रहाने दृष्टअसल्यांस अरिष्टांचा नाश होतो. जशि पतिपासुन विभक्त,विरक्त स्त्री त्याचा नाश करिते. जर लग्नापासुन 3, 6 ,11 स्थानांतील कोणत्याहि स्थानांत राहुअसुन तो शुभग्रहांनी दृष्ट असल्यांस सर्वअरिष्टांचा नाश होतो जसा वेगवान वायु कापसांच्या राशिंचा नाश करीतो.

शिर्षोदयेषु राशिषु सर्वेर्गगनाधिवासिभि:सूतौ। प्रकृतिस्थैश्चारिष्टं विक्रियते घृतमिवाग्निष्ठम् ॥5॥ तत्काले यदि विजयी शुभग्रह:शुभनिरिक्षितो वर्गे । तर्जयति सर्वारिष्टं मारुत इव पादपान प्रबला:॥6॥ परिविष्टो गगनचर: क्रूराश्च विलोकितो हरति पापम् । स्नानं सन्निहितानां कृतं यथा भास्करग्रहणे ॥7 ॥

जर जन्मावेळी सर्व ग्रह शिर्षोदय राशित असतिल तर रोगोत्पन्न व ईतर अरिष्टांचा नाश होतो. जर जन्मवेळी तत्काळ ग्रह विजयीअसेल, शुभ ग्रहाच्या वर्गात शुभ ग्रहदृष्ट असेल तर वेगवान वादळांत वायु ज्याप्रमाणे झाडांचा नाश करतो त्या प्रमाणे अरिष्टांचा नाश करतो. जर जन्मवेळी कोणताही ग्रह परिवेषांत(रक्तवर्ण,निलवर्ण, ईशतशुक्ल,मेघवर्ण,कृष्णश्वेतवर्ण,हरिवर्ण इत्यादि)असल्यांस व पापग्रहाने दृष्ट असल्यांस ज्याप्रमाणे सूर्यग्रहण काळांत स्नान केल्याने पापे दुर होतात त्याप्रमाणे अरिष्ट दुर होतात.

स्निग्धमृदुपवनभाजो जलदाश्च तथैव खेचरा: शस्ता: । स्वस्था: क्षणाच्च रिष्टं शमतन्ति रजौ यथाम्बुधारौघ: ॥8॥ उदये चागस्त्यमुने:सप्तर्षीणां मरिचिपुत्राणाम् । सर्वारिष्टं नश्यति तम इव सूर्योदये जगत॥9॥ अजवृषकर्किविलग्ने रक्षति राहु: समस्तपिडाभ्य:। पृथ्वीपति:प्रसन्न:कृतपराधं यथा पुरुषम्॥10॥

स्निग्ध,मृदु,पवनप्रदायक व शिघ्रयोग करणारा प्रशस्त ग्रह शिघ्रतेने अरिष्टांचे शमन करितो.ज्याप्रमाणे मेघाची धार धुळीचे शमन करिते.अगस्त मुनि व मरिच्यादि सप्तर्षिंचा उदय सर्वरिष्टांचा नाश करितो ज्याप्रमाणे सूर्योदयाने अंधकारचा नाश होतो.जर जन्मवेळी मेष,वृषभ व कर्क राशिमधिल राहू लग्नांत असेल तर तो सर्वअरिष्टांपासुन जातकाचे रक्षण करितो ज्याप्रमाणे प्रसन्न असलेला राजा अपराधि लोकांचेदेखिल रक्षण करितो.

यत्नेन भङ्गमपरे सरोजजन्मति विस्मयं कुरुते। तज्ज्ञ:कष्टमनिष्टं समतटदेशे यथा किरट: ॥11॥

अन्यअरिष्टभङ्ग योगामुळे अरिष्टजनित कष्ट व अरिष्टयोगांचे ब्रम्हदेवांना आश्चर्य वाटते अर्थांत कष्ट वअरिष्टांचा नाश होतो.

बहवो यदि शुभफलदा:खेटास्तत्रापि शीर्यते रिष्टम् । सूर्यात् त्रिकोण इन्दाै यथैव यात्रा नरेन्द्रस्य 12॥ गुरुशुक्राै च केन्द्रस्थाै जिवेद्वर्षशतं नरा: । गृहानिष्टं हिनस्त्याशु चंद्रानिष्टं तथैव च॥13॥

जर अधिक ग्रह शुभफल देणारे असतील आणि सूर्याच्या त्रिकोणांत चंद्र असेल तर राजयात्रे प्रमाणे सर्व अरिष्टांचा नाश करितो. गुरु ,शुक्र केन्द्रांत असतिल तर 100 वर्ष आयुष्य असते.ग्रहारिष्ट व चंद्रारिष्ट यांचा नाश होतो.

    'अथामितायु  योगमाह'

बन्ध्वास्पदोदयविलग्नगतैा कुलिरे गिर्वाणनाथ सचिव: सकलश्च:। जुके रविन्दुतनयावपरे च लाभे दुश्चिक्यशत्रुभवनेष्वमितं तदायु:॥14॥

जर कर्क राशिस्थ पुर्णचंद्र गुरुयुक्त असुन चतुर्थ,दशम अथवा लग्नांत,तुला राशित शनि,बुध व इतर ग्रह 3, 6 वा 11 व्या स्थानात असल्यांस "अमितायु योग होतो.(यांत 120 वर्षा पेक्षा जास्त आयुष्य असते.)

      'अथायोपसंहार'

एते सर्वे भङ्ग मया निरुक्ता: पुरातना: सिध्दा:। यैर्ज्ञातैर्दैवविदो नरेन्द्रवाल्लभ्यमायान्ति ॥15॥

वेदांग ज्योतिष्यशास्त्रातिल आचार्यांनी सिध्द केलेल्या या सर्वारिष्ट भङ्ग योगाचे वर्णन केलेले आहे ज्याच्या आकलनाने दैवज्ञ राजाला प्रिय होतात.

"इति कल्याणवर्मविरचितयां सारावल्यां सान्वय- मराठी व्याख्यायां सकलारिष्टभङ्ग नाम द्वादशोऽध्याय:"

संदर्भ :- "सारावलि" डाॅ.सुरकान्त झा,

संस्कृत-हिन्दी टिका