कॉमन्स:विकी लव्हज फोकलोर २०२४

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Wiki Loves Folklore 2024 and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Wiki Loves Folklore 2024 and have to be approved by a translation administrator.

Shortcut: COM:WLF24

  • Home Page
  • 2024
  • 2023
  • 2022
  • 2021
  • 2020
  • 2019


विकी लव्हज फोकलोर मध्ये आपले स्वागत आहे!

Wiki Folklore on website Wiki Folklore on Facebook {{{Threads}}} Wiki Folklore on Twitter Wiki Folklore on Instagram Wiki Folklore on Telegram Wiki Folklore on YouTube Wiki Folklore via mailing list

विकी लव्हज फोकलोर

विकी लव्हज फोकलोर (मेटा-विकी: विकी लव्हज फोकलोर) ही जगातील विविध प्रदेशांतील लोकसंस्कृतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठीची विकिमीडिया कॉमन्सवर दरवर्षी आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आहे. विकी लव्हज फोकलोर २०२३ ही लोकसंस्कृतीची संकल्पना असलेली विकी लव्हज फोकलोर २०२१ ची निरंतरता आहे. या प्रकल्पाची सुरुवात इ.स. २०१८ मध्ये विकी लव्हज लव्ह २०१९ पासून प्रेमाचा उत्सव आणि सणांच्या संकल्पनेने झाली.

व्याप्ती

ही छायाचित्रणाची स्पर्धा विविध प्रदेशातील लोकसंस्कृतीवर केंद्रित आहे, जसे की लोकोत्सव, लोकनृत्य, लोकसंगीत, लोककला, खेळ, पाककृती, पेहराव, लोकसाहित्य आणि परंपरा, बालगीते, लोककथा, परीकथा, दंतकथा, पारंपारिक गाणे आणि नृत्य, लोक नाटके, खेळ, हंगामी कार्यक्रम, दैनिक चालीरीती, लोककला, लोक धर्म, पौराणिक कथा इत्यादींचा यात समावेश असला तरी ही स्पर्धा इतक्यावरच मर्यादित नाही. तुम्ही आमच्या वर्गपानावर काही इतर सूचना आणि उदाहरणे पाहू शकता.

विषय

फोकलोर (लोकसाहित्य)
उपवर्ग

देशानुसार लोकसंस्कृती, लोककला, चिनी भविष्य कथन, लोकनृत्य, युरोपाडे, लोकोत्सव, लोकगीत, लोक खेळ, गवारी, लोकगट, लोक जादू, लोकसंग्रहालये, लोकसंगीत, न्यूवेलिंग, लोकधर्म, पारंपारिक संगीत, पारंपारिक गाणी, लोक कुस्ती.

बक्षिसे

विकी लव्हज फोकलोर साठी आंतरराष्ट्रीय बक्षीसे खालीलप्रमाणे आहेत:

  • पहिले बक्षीस: ४०० USD
  • दुसरे बक्षीस: ३०० USD
  • तृतीय बक्षीस: १०० USD
  • पहिली १० सांत्वनपर बक्षिसे: 40 USD प्रत्येक
  • सर्वोत्कृष्ट चित्रफीत पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिफीत पारितोषिके': प्रत्येकी ५० USD
  • सर्वोच्च चित्रसंचिका चढववणीसाठीचे बक्षीस': प्रथम पारितोषिक: ३०० USD, द्वितीय पारितोषिक: १५० USD
  • विकी लव्हज फोकलोर पोस्टकार्ड: सर्वोच्च १०० चढवयांना
  • स्थानिक आयोजकांना प्रमाणपत्रे आणि पोस्टकार्ड.
(अस्वीकरणः बक्षिसे प्रमुख ब्रँड भेट कार्ड किंवा व्हाउचरच्या स्वरूपात वितरित केली जातील, जी स्थानिक चलनाच्या रकमेच्या समतुल्य असेल.)

कालावधी

WLF २०२४ साठी टाइमलाइन खालीलप्रमाणे आहे

  • १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४
  • सबमिशनसाठी प्रारंभ: फेब्रुवारी १, 2024 ००:०१ (UTC)
  • सबमिशनची अंतिम मुदत: ३१ मार्च 2024 २३:५९ (UTC)
  • परिणाम घोषित: सुमारे १५ जुलै २०२४

आम्ही काय स्वीकारणार नाही

आम्ही हे माध्यम स्वीकारणार नाहीत:

  • कॉमन्स प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राबाहेरचे.
  • ज्यात EXIF माहितीचा अभाव आहे.
  • जे जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले आणि डिजिटली बदललेले आहेत.
  • अश्लील आणि उघड प्रतिमा.
  • प्रताधिकारीत कलाकृती इ.

संपर्क साधा

आमच्याशी संपर्क साधण्याचे अनेक मार्ग आहेत:

पाठवता येतील अशा छायाचित्रांसाठी उदाहरणे

फोकलोर लोक आणि उपक्रम

लोक खाद्य

लोक नृत्य

लोकोत्सव

लोक संगीत

लोकभूषा/वस्त्र

लेखन स्पर्धा

१ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लेखन स्पर्धा स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२४ असेल. या प्रकल्पासाठी स्त्रीवाद, महिला चरित्रे आणि लिंग-केंद्रित विषयांवर लेख तयार करा किंवा विस्तृत करा. विकी लव्हज फोकलोर लिंग अंतरावर लक्ष केंद्रित करणारी लीग विकिपीडियावर लोकसंस्कृती थीमसह.तुमच्या स्थानिक भाषेत आता सहभागी व्हा.